ऑनलाईन योग दिन संपन्न
संत मुक्ताबाई महाविद्यालयात ऑनलाईन योग दिन संपन्न
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रविवार दि 21 जुन 2020 रोजी सहाव्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर याच्यावतीने कोरोना काळात लॉकडाऊनची परिस्थिती असतांना महाविद्यालयातील क्रीडा विभागाने झूम ऍ़पच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी ऑनलाईन योग वर्गाचे लाईव्ह सेशन आयोजीत केले होते. महाविद्यालयात दरवर्षी 21 जुन रोजी योग दिनाचे आयोजन केले जाते. योग व प्राणायामच्या माध्यमातून प्रतिकार शक्ती वाढवून रोगांशी लढण्याचे बळ मिळते शरीरातील प्राण वायुचे प्रमाण वाढते. या योग दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय डी. पाटील तसेच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व सहभागी झाले होते. क्रीडा शिक्षक डॉ.विरेद्र जाधव यांनी योग आणि प्राणायमाचे ऑनलाईन सेशन घेतले. यात त्यांनी विविध योगासने व प्राणायमाचे तसेच सूर्यनमस्काराचे प्रात्याक्षिक घेतले. तांत्रिक सहकार्य डॉ.संदीप माळी यांनी केले. तसेच प्राचार्य डॉ.आय.डी.पाटील यांनी म्हटले की योगासने व प्राणायाम करतांना नेहमी सातत्य असावे तर आपल्याला दीर्घलाभ मिळू शकतात. शेवटी समारोपीय सत्रात संकल्प करून शांती पाठ घेवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.