वार्षिक स्नेहसंमेलन उमंग 2020
संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन "उमंग 2020" उत्साहात संपन्न झाले.....
त्यावेळची काही क्षणचित्रे
संत मुक्ताबाई महाविद्यालयात 'उमंग 2020' स्नेहसंमेलन संपन्न मुक्ताईनगर दिनांक:- 5 मार्च 2020 रोजी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई महाविद्यालयात ५ मार्च रोजी 'उमंग 2020' हे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मुक्ताईनगर येथील पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश जाधव यांच्या हस्ते झाले उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेवर बरोबरच सांस्कृतिक गुणवत्तेचे महत्व प्रतिपादन केले तसेच मुक्ताईनगर चे तहसीलदार शामकांत वाडकर यांनीही उपस्थितांना संबोधित करताना सांस्कृतिक कलागुणांच्या माध्यमातून विद्यार्थी कलावंतांनी सांप्रत समाजव्यवस्थेतील शेतकऱ्यांचे प्रश्न समाजासमोर मांडले पाहिजे असे प्रतिपादन केले मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी विक्रम जगदाळे यांनी सांस्कृतिक पर्यावरणा बरोबरच विद्यार्थ्यांनी नैसर्गिक पर्यावरणाचे जाणीवपूर्वक जतन करण्याचे आवाहन केले स्नेहसंमेलन उद्घाटन प्रसंगी डॉ जगदीश पाटील, डॉ. विक्रांत जयस्वाल, भरत आप्पा पाटील, दिलीप पाटील ,प्रवीण महाजन, रमेश महाजन, महाविद्यालयाचे शैक्षणिक समन्वयक प्रा एल बी गायकवाड ऍड अरविंद गोसावी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे आदी मान्यवर उपस्थित होते स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आय डी पाटील होते अध्यक्षीय समारोपात कलावंतांना संबोधित करताना ते म्हणाले की महाविद्यालयांमध्ये संपूर्ण वर्षभर होत असलेल्या विविध कार्यक्रमातून आमचा विद्यार्थी प्रशासकीय सेवा सामाजिक सेवा सांस्कृतिक कला गुणांमध्ये महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करीत आहे विद्यार्थ्यांची बौद्धिक व सांस्कृतिक भूक भागविणे हे आमच्या संस्थेचे आद्यकर्तव्य आहे या उदात्त भूमिकेतून उमंग वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले असून यात विविध कलागुणांचा आविष्कार करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा हेतू या माध्यमातून यशस्वी झाल्याचे समाधान याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले हे स्नेहसंमेलन विद्याभारती शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून साकार झाले उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा डॉ संदीप माळी यांनी केले तर प्रास्ताविक स्नेहसंमेलन प्रमुख प्रा डॉ रमेश शेवाळे यांनी केले आभार स्नेहसंमेलन समितीच्या सदस्य प्रा डॉ वंदना लव्हाळे यांनी मांडले दिनांक ३ मार्च पासून सुरू झालेल्या स्नेहसंमेलनात वादविवाद ,वक्तृत्व, काव्यवाचन, रांगोळी, मेहंदी ,पोस्टर प्रदर्शन, पावर पॉइंट प्रेझेंटेशन ,प्रश्नमंजुषा, आनंद मेळावा आदी. स्पर्धा तसेच क्रीडा विभागाच्या क्रिकेट, कबड्डी, रस्सीखेच, बॉल बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग या स्पर्धा संपन्न झाल्या स्नेह संमेलनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे समूहनृत्य, एकल नृत्य, गीत गायन ,मूकनाट्य, नाटक, एकपात्री प्रयोग. या विविध कला प्रकाराचे दर्शन विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनातून घडविले संगीत कला ,नाट्य कला ,व नाट्यकलेचे परीक्षण समीर कुलकर्णी, रमेश सावळे आणि बिंदू बोदडे यांनी केले स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रा संजय सैंदाणे, प्रा बी जी माळी, प्रा आर एल कछवा ,प्रा बी एल महाजन, प्रा पी एम सोनवणे , प्रा के पी पाटील, डॉ पंचशीला वाघमारे, डॉ. विरेंद्र जाधव , प्रा एम एम चव्हाण , प्रा अजित कुलकर्णी, प्रा शकुंतला गड्डम , प्रा बी आर मिस्त्री, प्रा व्हि. ए. बावस्कर, प्रा. आर. एस. वासनिक , प्रा. ए. बी. शेख, प्रा प्राजक्ता पाटील, प्रा जयश्री शिंगोटे, प्रा. पी. एस. देशमुख, प्रा. अविनाश तायडे, प्रा एल. एन. तायडे, आर सी पाटील, जगदीश शिसोदिया,अशोक पाटील, चंद्रकांत विसाळे , प्रदीप पाटील ,लीलाधर महाजन, व निलेश मेढे आदींनी स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले व स्नेहसंमेलन हे यशस्वीपणे संपन्न झाले.