(Please click on respective photo for larger view)
|
संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयात रीडिंग हॅबिट्स या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबीनार संपन्न मुक्ताईनगर- संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि ग्रंथालय यांच्यावतीने दिनांक 4 डिसेंबर 2020 रोजी रीडिंग हॅबिट्स या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे (वेबिनार) आयोजन करण्यात आले. खापर महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. डॉ. प्रदीपकुमार घंटे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. माणसाच्या जीवनाला दिशा देण्यासाठी वाचन ही एक अत्यंत महत्त्वाची अशी साधना असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. व्यक्तीने काय वाचावे? आणि कसे वाचावे? यासंदर्भात चर्चा करत असताना त्यांनी वाचन ही मानवाची अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या इतकीच महत्वाची मूलभूत गरज आहे असे सांगितले. महात्मा फुले, वॉरन बफेट, बिल गेट्स, डॉ बाबासाहेब आंबेडकर या जग बदलणाऱ्या सुधारकांच्या जीवनामध्ये वाचनानेच खऱ्या अर्थाने क्रांती घडवून आणली, याबद्दल त्यांनी यावेळी चर्चा केली. वेबिनारचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आय डी पाटील उपस्थित होते. डॉ पाटील यांनी वाचनाचे महत्त्व पटवून देताना वाचनाची सवय झाली पाहिजे आणि वाचाल तर वाचाल या माध्यमातून वाचन आणि त्याची गरज स्पष्ट केली. जोपर्यंत मानवाचा बौद्धिक विकास होत नाही तोपर्यंत राष्ट्र सक्षम होऊ शकत नाही, असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या वेबिनारला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील तीनशेहून अधिक नोंदणी प्राप्त झाल्या होत्या. वेबिनार मध्ये झूम ऑनलाइन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून 100 तर युट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून साठहून अधिक सहभागींनी सहभाग नोंदवला. त्यात प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि सुज्ञ वाचकांचा विशेष सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप कडू माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. एम एम चव्हाण यांनी केले. |
PHOTO ALBUMS: |
Sant Muktabai Arts and Commerce College, Muktainagar,
District: Jalgaon - 425306
Phone:02583-234322