27/07/2019 - पुणे येथील युनिक ऍकॅडमी आणि संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर च्यासंयुक्त विद्यमाने एमपीएससी यूपीएससी बँकिंग रेल्वे इत्यादी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी प्राध्यापक सुनील देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यानास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. डी. पाटील तसेच महाविद्यालयाचे स्पर्धापरीक्षा समन्वयक डॉ. शेवाळे व महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.